बातमी 2

वाचन प्रेरणा दिन - बातमी लेखन
बातमीलेखन :

• ‘न्यू इंग्लिश स्कूल, रत्नागिरी’ या विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा झाला. या समारंभाची बातमी तयार करा.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
आमच्या वार्ताहराकडून,
रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर.

येथील न्यू इंग्लिश स्कूल, रत्नागिरी येथे काल १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या दिवशी शाळेत 'नो बॅग डे' पाळण्यात आला होता. दिवसभर विद्यार्थ्यांनी विविध स्फूर्तिदायक पुस्तकांचे वाचन केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या मैदानावर भरवण्यात आलेली 'ग्रंथदिंडी'. विद्यार्थ्यांनी हातात वाचनाचे महत्त्व पटवून देणारे फलक घेऊन परिसरातून फेरी काढली. तसेच, ग्रंथालयामार्फत दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात "वाचाल तर वाचाल" हा संदेश देऊन विद्यार्थ्यांना दररोज किमान एक पान अवांतर वाचन करण्याचा संकल्प करायला लावला. शालेय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जेम्स क्लिअर यांचे 'ॲटॉमिक हॅबिट्स' (Atomic Habits)

पुस्तकाचे नाव: ॲटॉमिक हॅबिट्स (Atomic Habits) लेखक: जेम्स क्लिअर (James Clear) पुस्तकाची सुरुवात लेखकाच्या, जेम्स क्लिअरच्या, आय...