एक छान अनुभव जो मी स्वत: आजही घेत आहे, तुमच्यासाठी पाठवत आहे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. नुकसान अजिबात नाही. 😊 रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत.... याचं उत्तर माझ्या एका मित्राकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. तो म्हणाला की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काहीच नाही' असं म्हटलं की तो, 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायचा. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. तोपण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायचा. काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला , अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्याच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायoचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात. तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जातानाही 'आत देव आहे' या विश्वासाने नाही का नमस्कार करतो......... तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तरं दिलेच पाहिजे....
केंद्रप्रमुख भरती GR १/१२/२२
शैक्षणिक बातम्या
आजची चांगली गोष्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
आजची चांगली गोष्ट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर मी माझे आयुष्य पुन्हा डिझाइन करू शकलो तर, मी ते अशाप्रकारे जगेन? हा प्रश्न साधा ...
-
वारांचे कोड रविवार- 0 सोमवार 1 मंगळवार 2 बुधवार 3 गुरुवार 4 शुक्रवार 5 शनिवार 6 महिन्यांचे कोड 0 मे 1 ऑगस्ट 2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर 3 ...
-
तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट शोधताय का? तुम्हाला रोज स्वतःला थोडं तरी चांगलं बनवायचंय का? जर हो, तर हा लेख ...
-
नमस्कार मित्रांनो, studyhelp बुक समरी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रे वीडेन यांच्या सेल्फ डिसिप्लिन या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत...
-
वॉरेन बफेट जेव्हा दहा वर्षांचे होते, तेव्हा त्यांची ओमाहामधील ओफन बन्नी नावाच्या घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानात उत्सुकतेने पाऊले...
-
"मित्रांनो, जरा कल्पना करा! जर तुम्हाला तुमच्या जगण्याचा खरा अर्थ सापडला, तो ध्यास ज्याच्या शोधात आपण सगळे असतो, तो जर तुम्...
-
नमस्कार मित्रांनो, 'चैतन्य ब्लॉग' मध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे! कधी विचार केला आहे का, केवळ आपले विचार, आपली ऊर्जा आ...
-
कल्पना करा की तुम्ही अशा जगात राहत आहात जिथे प्रत्येकजण झपाट्याने श्रीमंत होण्याच्या मागे धावत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणारे...
-
तुमचे मन हे एका वेड्या माकडासारखे आहे. जे न थांबता इकडे तिकडे उड्या मारत राहते, पण मी वचन देतो की, हा सारांश वाचल्या...
-
रॉबर्ट कियोस्की,जगभरात त्याच्या प्रभावी आर्थिक विचारांसाठी ओळखले जातात आणि आज मी त्यांचे काही खास विचार त्यांच्या प्रसिद्ध अवतरण...