मनोहर पर्रिकर देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांनी गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या गावच्या कलिंगडांची सांगितलेली गोष्ट भरपूर काही शिकवणारी आहे. कलिंगडातून समजावला आयुष्याचा अर्थ मी गोव्यातील पारा गावचा. त्यामुळे आम्हाला सगळे पर्रिकर बोलतात. माझ गाव कलिंगडाच्या शेतीसाठी प्रसिद्ध होते. मी लहान असताना आमच्या गावातील शेतकरी मे महिन्यात कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचे. जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावले जायचे. काही वर्षांनी मी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आयआयटी मुंबईला गेलो. साडेसहा वर्षांनी जेव्हा मी पुन्हा गावी गेलो. त्यावेळी मी कलिंगड घेण्यासाठी बाजारात गेलो. त्यावेळी तिथे छोटया आकाराची कलिंगड मला दिसले. जो शेतकरी कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा त्याला भेटण्यासाठी मी गेलो. त्यावेळी सूत्र त्याच्या मुलाच्या हाती होती. त्याचा मुलगा कलिंगड खाण्याची स्पर्धा भरवायचा पण त्यात फरक पडला होता. ज्यावेळी त्या मुलाचे वडिल आम्हाला कलिंगड खायला द्यायचे त्यावेळी कलिंगडाच्या बिया एका भांडयात जमा करायला ते आम्हाला सांगायचे. पुढच्या हंगामासाठी ते या बिया गोळा करायचे. आम्ही त्यांच्यासाठी बिनपगारी बालमजूर होतो. ते स्पर्धेसाठी सर्वोत्तम कलिंगड ठेवायचे त्यामुळे पुढच्या हंगामात अधिक मोठया आकाराचे चांगले कलिंगड मिळायचे. पण त्यांच्या मुलाने जेव्हा व्यवसाय संभाळला तेव्हा मोठया आकाराच्या कलिंगड विक्रीतून जास्त पैसा मिळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी कलिंगडे तो बाजारात विकायचा आणि छोटी कलिंगडे स्पर्धेसाठी ठेवायचा. त्यामुळे त्या बियांमधून तयार होणा-या कलिंगडचा आकार छोटा असायचा. जशी वर्ष पुढे सरकत गेली तसा कलिंगडाचा आकार छोटा होत गेला. कलिंगडामध्ये एका पिढीमध्ये एका वर्षाचे अंतर असते. सातवर्षात परामधील सर्वोत्तम कलिंगड संपलेले होते. माणसांमध्ये २५ वर्षानंतर एक पिढी बदलते. त्यामुळे आपल्याला पुढच्या २०० वर्षांनी आपण मुलांना शिकवताना काय चूक केली ते शोधावे लागेल. आपण आपल्या पुढच्या पिढीला चांगली शिकवण दिली नाही तर, कलिंगडासारखेच आपल्या बाबतीत घडू शकते.
सोमवार, ३ एप्रिल, २०१७
चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजेत.

बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते
🚜 वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते | प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 📘 पुस्तकाचा परिचय प्रस्तावना शेअ...
-
तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? जर मी माझे आयुष्य पुन्हा डिझाइन करू शकलो तर, मी ते अशाप्रकारे जगेन? हा प्रश्न साधा ...
-
वारांचे कोड रविवार- 0 सोमवार 1 मंगळवार 2 बुधवार 3 गुरुवार 4 शुक्रवार 5 शनिवार 6 महिन्यांचे कोड 0 मे 1 ऑगस्ट 2 फेब्रुवारी मार्च नोव्हेंबर 3 ...
-
तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट शोधताय का? तुम्हाला रोज स्वतःला थोडं तरी चांगलं बनवायचंय का? जर हो, तर हा लेख ...