पत्र 1

इयत्ता दहावी उपयोजित लेखन - पत्रलेखन

पत्रलेखन नमुने (आधुनिक ई-मेल फॉरमॅट)

१. मागणी पत्र (वाचक या नात्याने)
दिनांक: ५ जानेवारी २०२६

प्रति,
मा. व्यवस्थापक,
अजय पुस्तकालय,
शिवाजीनगर, छत्रपती संभाजी नगर.
विषय: पुस्तकांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

मी अमित जगदाळे, आपल्या अजय पुस्तकालयाचा नियमित वाचक आहे. आपल्या दुकानात अमृतमहोत्सवानिमित्त १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत पुस्तक खरेदीवर २०% सवलत दिली जात असल्याचे जाहिरातीवरून समजले.

मला अभ्यासासाठी आणि अवांतर वाचनासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे:

१. मृत्युंजय - १ प्रत
२. अग्निपंख - १ प्रत
३. श्यामची आई - १ प्रत

तरी वरील पुस्तके सवलत वजा करून मला टपालाने त्वरित घरपोच पाठवावीत, ही विनंती. पुस्तकांचे एकूण बिल आणि टपाल खर्च माझ्या ईमेलवर कळवल्यास मी पैसे ऑनलाइन भरून देईन.

२. आभार पत्र (वाचक या नात्याने)
दिनांक: १० जानेवारी २०२६

प्रति,
मा. व्यवस्थापक,
अजय पुस्तकालय,
शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर.
विषय: पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल आभार मानण्याबाबत.

महोदय,

मी अमिता जगदाळे, आपल्या अजय पुस्तकालयाची एक वाचक या नात्याने हे पत्र लिहीत आहे.

आपल्या पुस्तकालयाने अमृतमहोत्सवानिमित्त १ ते १५ जानेवारी दरम्यान पुस्तक खरेदीवर २०% सवलत देण्याची जी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. आपल्या या सवलतीमुळे मला हवी असलेली दर्जेदार पुस्तके कमी किमतीत खरेदी करता आली.

वाचकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आपण राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. धन्यवाद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जेम्स क्लिअर यांचे 'ॲटॉमिक हॅबिट्स' (Atomic Habits)

पुस्तकाचे नाव: ॲटॉमिक हॅबिट्स (Atomic Habits) लेखक: जेम्स क्लिअर (James Clear) पुस्तकाची सुरुवात लेखकाच्या, जेम्स क्लिअरच्या, आय...