८ मार्च 'जागतिक महिला दिनानिमित्त' शाळेत 'माता-पालक मेळावा' व विविध स्पर्धांचे आयोजन. पालकांचा उदंड प्रतिसाद.
महाबळेश्वर: येथील श्री भैरवनाथ विद्यालय, गोगवे येथे ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिनानिमित्त' माता-पालक मेळावा आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोगवे पंचक्रोशीतील माता-पालकांनी उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. शाळेच्या वतीने आयोजित या मेळाव्यात महिलांसाठी आरोग्य प्रबोधन आणि शैक्षणिक जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माता-पालकांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा आणि उखाणे स्पर्धा अशा विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन केले होते.
मुख्याध्यापकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मातेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या मातांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदाने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. या मेळाव्यामुळे पालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा