एका नदीच्या काठी एक छोटीशी गावची वस्ती वसलेली होती. वस्तीतील लोक गुण्यागोविंदाने राहत होते. एकदा पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाला आणि नदीला मोठा महापूर आला. प्रशासनाकडून वस्तीतील लोकांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता.
लोक सुरक्षित जागी जाण्याची तयारी करत असतानाच अचानक वस्तीत पाण्याचा मोठा लोंढा शिरला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की सगळीकडे धावपळ उडाली. या गोंधळात एक लहान मुलगी पुराच्या पाण्यात अडकली. ती स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती. आजूबाजूला खूप आरडाओरडा झाला, पण पाण्याच्या वेगामुळे कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती.
तेवढ्यात पंधरा वर्षांचा सौरभ तिथे आला. त्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सौरभने पाण्यात उडी घेतली. मोठ्या जिद्दीने त्याने त्या लहान मुलीला पकडले आणि सुखरूप बाहेर काढले. सौरभच्या या धाडसामुळे एका चिमुकलीचे प्राण वाचले.
सौरभवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. त्याच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्याला शासनातर्फे 'बालवीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा