adarshvidya@gmail.com
खालीलपैकी कोणतेही एक पत्र लिहा:
मा. क्रीडाप्रमुख,
आदर्श विद्यामंदिर,
छत्रपती संभाजीनगर.
महोदय,
मी अमित रेगे, आपल्या विद्यालयातील इयत्ता १० वी 'अ' चा वर्गप्रतिनिधी या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे.
आपल्या विद्यालयात १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत वार्षिक क्रीडामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा एक संघ अतिशय उत्सुक आहे. या संघाने गेल्या दोन महिन्यांपासून नियमित सराव केला आहे.
तरी आमच्या या कबड्डी संघाला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती. आमच्या संघातील खेळाडूंच्या नावाची यादी मी या पत्रासोबत जोडत आहे. आपण आम्हाला सहकार्य कराल, अशी मला खात्री आहे.
सप्रेम नमस्कार.
प्रिय सुमित,
कालच आपल्या विद्यालयाचा वार्षिक क्रीडामहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवातील वैयक्तिक धावण्याच्या स्पर्धेत आणि लांब उडीत तू प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले, हे पाहून मला खूप आनंद झाला.
क्रीडाप्रमुखांच्या हस्ते जेव्हा तुला 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' म्हणून गौरवण्यात आले, तो क्षण आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा होता. तुझा सराव आणि खेळाप्रती असलेली तुझी निष्ठा आज फळाला आली आहे.
तुझ्या या देदीप्यमान यशाबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन! अशीच प्रगती करत राहा आणि भविष्यात तू राष्ट्रीय स्तरावर खेळावे, हीच सदिच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा