🚩 मराठी म्हणींचा संपूर्ण खजिना 🚩
अ
अकातली गाय अन् काटे खायनाराज व्यक्ती काहीही करायला तयार असतो.
अक्कल नाही काडीची, नाव सहस्त्रबुद्धेनाव मोठे लक्षण खोटे.
अगं अगं म्हशी मला कुठे नेशीस्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे.
अचाट खाणे मसणात जाणेअतिरेकपणे खाल्ल्यास त्याचे परिणाम वाईट होतात.
अटक्याचा सौदा येरझारा चौदाअडलेल्या कामासाठी जास्त मेहनत घेणे.
अडला हरी गाढवाचे पाय धरीशहाण्या माणसाला प्रसंगी मुर्खाचे पाय धरावे लागतात.
अडली गाय फटके खायअडचणीत सापडलेल्याला हैराण केले जाते.
अति तेथे मातीकोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसानच होते.
अति राग भीक मागरागीट मनुष्य आपलेच नुकसान करून घेतो.
अति शहाणा त्याचा बैल रिकामास्वतःला अति शहाणा समजणारा कृती काहीच करीत नाही.
अति झाले गावचे अन् पोट फुगले देवाचेकृत्य एकाचे अन् त्रास दुसऱ्याला होणे.
अति झाले, आसू आलेकोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की दुःख होते.
अंधारात केले, पण उजेडात आलेगुप्तपणे केलेली गोष्ट कधी ना कधी लोकांना माहीत होणारच.
अंधारात चोरास बळअनुकूल परिस्थितीत बळ वाढणे.
अन्नाचा येतो वास, कोरीचा घेतो घासइच्छा असूनसुद्धा नाही असे भासवणे.
अपमानाची पोळी सर्वांग जाळीअपमानातून मिळालेल्या लाभाचा त्रास होतो.
अंथरूण पाहून पाय पसरावेआपल्या कुवतीप्रमाणे खर्च करावा.
अवचित पडे नि दंडवत घडेस्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडेएकमेकींच्या विरुद्ध असणे.
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठचुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास आपले प्राण धोक्यात येतात.
असतील शिते, तर जमतील भूतेएखाद्याकडे पैसा, धन असेल तोपर्यंतच त्याच्याजवळ चार माणसे असतात.
असेल तर दिवाळी, नसेल तर शिमगाआहे तोपर्यंत उधळपट्टी करणे, शेवटी उपवासाची वेळ येणे.
असेल तेव्हा तेल तवा, नसेल तेव्हा कोरडे जेवाआहे तोपर्यंत उधळपट्टी करणे.
अंग माझे बायले, सर्व तुला वाहिलेपत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा माणूस.
अंगापेक्षा बोंगा मोठाखऱ्या गोष्टीपेक्षा अवडंबरच जास्त.
अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाजगरजवंताला अक्कल नसते.
अंगावरचे लेणे, जन्मभर देणेदागिन्यांसाठी कर्ज काढून ते आयुष्यभर फेडत बसणे.
अंगी नाना कळा, पण वेश बावळापोशाखावरून साधी दिसणारी व्यक्ती आतून वेगळी असते.
आ
आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईनादोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची स्थिती मोठी केविलवाणी होते.
आईची माया अन् पोर जाईल वायाफार लाड केले तर मुले बिघडतात.
आईच्या लुगड्याला बारा गाठी, बायकोला पितांबर घाटीआईकडे दुर्लक्ष आणि बायकोचे लाड.
आईजीच्या जिवावर बायजी उदारदुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे.
आग खाईल तो कोळसे ओकेलजसे काम तसेच फळ मिळते.
आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरीगरजुंना मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला जाणे.
आचार भ्रष्टी सदा कष्टीज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखीच असतो.
आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगेसंकुचित वृत्तीचा व्यक्ती विशाल विचार सांगतो.
आधणातले रडतात तर सुपातले हसतातस्वतः संकटात असूनसुद्धा दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येणे.
आधी पोटोबा मग विठोबाप्रथम पोटाची सोय पाहणे नंतर दानधर्म करणे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मासआळशी व्यक्तीला पोषक वातावरण मिळणे.
आंधळं दळतं कुत्रं पीठ खातंकाम एकाचे आणि फायदा मात्र दुसराच घेणार.
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळेअपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकालाज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे.
आयत्या बिळावर नागोबाएखाद्याच्या कामाचा फायदा दुसऱ्याने घेणे.
इ, उ, ए, ओ
इकडे आड तिकडे विहीरदोन्ही बाजुंनी अडचणीत सापडणे.
उधळ पाण्याला खळखळाट फारअंगी कमी गुण असणारा खूप बढाई मारतो.
उंदराला मांजर साक्षवाईट कृत्यावेळी एकमेकांना साथ देणे.
एक ना धड भाराभर चिंध्याएकाच वेळी जास्त कामे हाती घेतल्यास सर्वच कामे अर्धवट राहतात.
एका हाताने टाळी वाजत नाहीदोघांच्या भांडणामध्ये एकाला दोष देता येत नाही.
ऐकावे जनाचे, करावे मनाचेलोकांचे ऐकून घ्यावे आणि मनाला योग्य वाटते ते करावे.
ओठात एक आणि पोटात एकमनात वेगळे विचार आणि बाहेर बोलणे वेगळे.
क, ख, ग, घ
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडू ते कडूचजन्मतः स्वभाव आहे तसाच राहतो.
कर नाही त्याला डर कशाला?वाईट गोष्ट केली नाही तर भीती वाटणार नाही.
करावे तसे भरावेजशी कृती तसे फळ मिळते.
काखेत कळसा अन् गावाला वळसावस्तू जवळच असते पण गावभर शोधाशोध.
कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीक्षुद्र माणसाने जरी वाईट चिंतले तरी नुकसान होत नाही.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेचमूर्ख माणसाला कितीही समजावून सांगितले तरी उपयोग होत नाही.
कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळआपलाच मनुष्य आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो.
गरज सरो, वैद्य मरोगरजेपुरते संबंध ठेवणे नंतर विसरून जाणे.
गर्वाचे घर खालीगर्विष्ट माणसाची शेवटी फजिती होत असते.
घरोघरी मातीच्या चुलीसर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
च, ज, त, द, ध
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचेप्रत्येकाला अधिकार गाजवायला आयुष्यात संधी मिळते.
चोराच्या मनात चांदणेवाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीमाणसाला ज्या सवयी असतात त्या शेवटपर्यंत राहतात.
तळे राखी तो पाणी चाखीज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी असते तो तिचा उपयोग करतोच.
दगडापेक्षा वीट मऊमोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते.
धड ना भड, दोन्हीकडे घडदोन्ही बाजू सांभाळता न आल्याने नुकसान होणे.
धनी तो धनी, नाहीतर धुपने पाणीमालक असेल तरच गोष्टी व्यवस्थित होतात.
न, प, ब, म
न कर्त्याचा वार शनिवारज्याला काम करायचे नसते, तो काहीतरी सबबी सांगतो.
नाव मोठे, लक्षण खोटेनाव खूप मोठे पण प्रत्यक्षात गुण शून्य.
पळसाला पाने तीनचकोठेही गेले तरी परिस्थिती सारखीच असणे.
बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटावडिलांचे गुण मुलामध्ये उतरतात.
मनी वसे ते स्वप्नी दिसेज्या गोष्टीचा ध्यास असतो, तीच स्वप्नात दिसते.
मरावे परी कीर्तीरूपी उरावेदेह गेला तरी लोकांनी चांगले काम लक्षात ठेवावे.
मुंगी होऊन साखर खावीनम्रतेने वागल्यास फायदा होतो.
य ते ह
येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्यापुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती निर्माण होणे.
राजा बोले, दल हालेमुख्य व्यक्तीच्या आज्ञेनुसार सर्वजण वागतात.
लहान तोंडी मोठा घासआपल्या योग्यतेपेक्षा मोठी गोष्ट बोलणे.
लेकी बोले, सुने लागेएकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
वासरात लंगडी गाय शहाणीअडाणी लोकांत अल्पज्ञानीही शहाणा ठरतो.
शितावरून भाताची परीक्षाएका लहान गोष्टीवरून संपूर्ण गोष्टीचा अंदाज घेणे.
सगळेच मुसळ केरातमुख्य गोष्टच विसरणे किंवा कामाचा विचका होणे.
हात फिरे तिथे लक्ष्मी वसेकष्टाळू माणसाकडे संपत्ती येते.
अकातली गाय अन् काटे खायनाराज व्यक्ती काहीही करायला तयार असतो.
आपलेच दात आपलेच ओठआपल्याच व्यक्तीने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पाहायचे वाकूनआपले दोष लपविणे और दुसऱ्याचे दोष दाखवणे.
आला चेव तर केला देव नाहीतर हर हर महादेवनियमित असे काहीच करायचे नाही.
आले अंगावर, तर घेतले शिंगावरमिळालेल्या संधीचा फायदा घेणे.
आवळा देऊन कोहळा काढणेदुसऱ्याचे थोडेसे करून त्या बदल्यात आपला भरपूर फायदा करून घेणे.
आलीया भोगासी असावे सादरजे नशीबात असेल ते भोगावयास तयार असावे.
आहेर नारळाचा आणि गजर वाजंत्र्यांचाकाम थोडे पण बोभाटा मोठा करणे.
आपला हात जगन्नाथआपली प्रगती आपल्यावर अवलंबून असते.
इ ते ऊ
इच्छी परा ते येई घरादुसऱ्याचे जे आपण चिंतितो तेच आपल्या वाट्याला येते.
इकडं तिकडं मिरवते, बांडा बैल फिरवतेविनाकारण मध्ये मध्ये करणे.
ईश्वराची माया कुठे ऊन, कुठे छायापरमेश्वर कृपेने कोणी सुखी तर कोणी दुःखी आहे.
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतोजन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
उचलली जीभ लावली टाळ्यालामनाप्रमाणे बोलणे किंवा अविचाराने वागणे.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगउतावीळपणे मुर्खासारखे वर्तन करणे.
उतावळी बावरी (नवरी) म्हाताऱ्याची नवरीअतिउतावळेपणा नुकसानकारक असतो.
उठता लाथ, बसता बुक्कीप्रत्येक कृतीबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
उंदीर मेला आणि गाव गोळा झालाक्षुल्लक गोष्टीचा गवगवाच फार.
उसाच्या पोटी कापूसचांगल्या किंवा सद्गुणी व्यक्तीच्या पोटी दुर्गुणी मुले जन्मास येणे.
उडत्या पाखराची पिसे मोजणेअगदी सहजपणे दुरच्या गोष्टीचे परीक्षण किंवा निरीक्षण करणे.
ऊस गोड आहे म्हणून मुळासकट खाऊ नयेएखाद्या व्यक्तीचा फायदा होत असेल तर अतिरेक करू नये.
ऊसात भांगसद्गुणापोटी दुर्गुण.
उंटावरची चोरी ओणव्याने लपत नाहीउघड केलेले वाईट कृत्य लपत नाही.
उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठीप्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार काम करतो.
उधार तेल खवटउधारीच्या वस्तूत कमतरता असते.
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडेश्रीमंत माणसापाशी गोड बोलणारे लोक येतात.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावेयेताना ताठ मात्र जाताना खाली मान घालणे.
उधारीचे पोते सव्वा हात रितेउधारी देणारा काटा मारतोच.
उचललं पाल अन् पुढच्या गावा चालसतत भटकंती करणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूकएखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी वाट पाहणे.
उंबर फोडून केंबर काढणेडोंगर पोखरून उंदीर काढणे.
ए ते ओ
एका माळेचे मणीसगळ्या व्यक्ती सारख्या स्वभावाच्या असणे.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्यालाएका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होतो.
एक घाव दोन तुकडेलवकर निर्णय घेणे.
एक कान सैरा, एक कान बहिरास्वतःच्या फायद्याचे तेवढे ऐकावे, बाकीचे सोडून द्यावे.
एकाची जळते दाडी, दुसरा त्यावर पेटवतो बिडीदुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा फायदा करून घेणे.
ऐतखाऊ गोसावी, टाळभैरव बैरागीआळशी लोकांची कधी कधी चंगळ असते.
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।मोठ्या व्यक्तींना यातनाही अधिक असतात.
ऐंशी तेथे पंच्याऐंशीअतिशय उधळेपणाचा स्वभाव.
ओढाळ गुराला लोढणे गळ्यालागुन्हेगाराला कायद्याचा वचक बसायला हवा.
एकादशीच्या घरी शिवरात्रअडचणीमागे अडचण येत राहणे.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नयेएकाने मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहान वाईट गोष्ट करू नये.
एक भाकरी सोळा नारीएका जागेसाठी अनेकांचा दावा.
क ते ख
करीन ती पूर्वहेकटपणा किंवा मी करेन तेच योग्य अशा रीतीने वागणे.
कशात काय नि फाटक्यात पायवाईटामध्ये जास्तच वाईट घडणे.
कवड्यांचे दान वाटले, गावात नगारे वाजलेकाम थोडेसे पण गवगवाच जास्त.
कधी तुपाशी तर कधी उपाशीसांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही.
करून गेले काय अन् उलटे झाले पायकेले एक आणि झाले भलतेच अशी अवस्था.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हतीनाश होण्याची वेळ आली होती पण थोडक्यात बचावले.
कामापुरता मामा / ताकापुरती आजीगरजेपुरते गोड बोलणारा किंवा विचारपूस करणारा.
कानाला ठणका अन् नाकाला औषधरोग एकीकडे आणि औषध भलतीकडे लावणे.
कानामागून आली आणि तिखट झालीनंतर येवून वरचढ होणे.
कावीळ झालेल्याला सर्व पिवळे दिसतेपूर्वग्रहित व्यक्तीला सर्वत्र दोषच दिसतात.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीअतुट नाते किरकोळ कारणांनी तुटत नाही.
कोल्ह्याला द्राक्षे आंबटजी वस्तू आपल्याला मिळत नाही ती वाईट आहे असे सांगणे.
कोळसा उगळावा तितका काळाचमुळात वाईट असणाऱ्या गोष्टीवर कितीही चर्चा केली तरी ती वाईटच असते.
काप गेले नि भोके राहिलीवैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या.
खाण तशी मातीआईवडिलांप्रमाणे मुलांची वागणूक असते.
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेबोलणे एक व कृती वेगळी असे करणे.
खायला काळ, भुईला भारनिरुपयोगी मनुष्य.
कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडीएकच परिस्थिती कायम राहत नाही.
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावातचुकीच्या मार्गाने शोध घेणे.
काकडीची चोरी, फाशीची शिक्षालवान गुन्ह्याला मोठी शिक्षा देणे.
कानाला कोपर जडेना, सासू मेली जावई काही रडेनामाया, प्रेम असावे लागते, त्याचे नाटक करता येत नाही.
कुडास कान ठेवी ध्यान / भिंतीला कान असतातगुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही.
कुठे जाशी भोगा तो तर तुझ्यापुढे उभाजे संकट येऊ नये असे वाटते ते संकट येणे.
कुडी तशी पुडीशरीराप्रमाणे आहार असणे.
केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळीअत्यंत गरिबीची अवस्था असणे.
केळी खाता हरखले, हिशेब देता टरकलेफुकटचे पैसे आहे तोपर्यंत काहीच न वाटणे, पैसे संपताच दुःख वाटणे.
कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे शामभटाची तट्टाणीथोर व क्षुद्र यांची तुलना होवू शकत नाही.
कोठे राजा भोज, कोठे गंगू तेलीचांगल्या बरोबर क्षुद्र वस्तूची बरोबरी करणे.
कोल्हा काकडीला राजीक्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
कोळशाला आला दर, जाळून टाकले घरतात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानीचा व्यवहार करणे.
खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशीअसेल तोपर्यंत चैन, नाही तर उपवास.
खाल्ल्या घरचे वासे मोजणेउपकारकर्त्याचे वाईट चिंतणे.
खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेलालहानशा गोष्टीची उपेक्षा केल्यास मोठे परिणाम होवू शकतात.
खोड जडली बाळपणी, सुटत नाही मोठेपणीलहानपणी वाईट सवय मोठेपणी सुटत नाही.
ग ते घ
गरजेल तो पडेल काय?केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काहीच घडत नाही.
गाढवाला गुळाची चव काय?ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्याचे महत्त्व कळत नाही.
गाव करी ते राव न करीसमुदायाने जे काम होते ते राजाच्या हातूनही होणार नाही.
गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळमुर्ख लोक एकत्र आल्यास गोंधळातच भर पडते.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रामोठ्या लोकांबरोबर लहानांचाही फायदा होतो.
गाय व्याली, शिंगी झालीअघटित घटना घडणे.
गाव जळे नि हनुमान बेंबी चोळेदुऱ्याचे नुकसान करून नामनिराळे राहणे.
गुरुची विद्या गुरुला फळलीएखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे.
गोगलगाय अन् पोटात पायवरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतातप्रतिकूल परिस्थितीत सर्वच आपल्या उलट वागू लागतात.
घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडेअडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे.
घर ना दार देवळी बिऱ्हाडस्वतःवर जबाबदारी नसलेली व्यक्ती.
घर चंद्रमौळी आणि बायकोला साडी-चोळीघरात गरीबी मात्र बायकोसाठी खूप खर्च करणारा.
घरासारखा गुण, सासू तशी सूनलहान मोठ्यांचे अनुकरण करीत असतात.
घोडी मेली ओझ्याने, शिंगरु मेले हेलपाट्यानेआई काम करून दमते तर तिच्यामागे मूल फिरून फिरून दमते.
गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवयाअडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा उपयोग करू शकत नाही.
गळा नाही सरी, सुखी निद्रा करीअंगावर सोने नसणारी स्त्री सुखाने झोपू शकते.
गावात नाही झाड, एरंडाला आला पाडअभावग्रस्त परिस्थितीत छोटी बाब मोठी समजली जाते.
घरात नाही तीळ अन् मिशांना देतो पीळरिकामा ऐट दाखविणारा व्यक्ती.
घटका पाणी पिते, घड्याळ टोले खातेमाणसांना आपापल्या कर्मानुसार सुख-दुःख भोगावी लागतात.
च ते ज
चोराच्या उलट्या बोंबास्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
चोरावर मोरएखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यापेक्षा वरचढ ठरणे.
चोर सोडून संन्याशाला फाशीअपराधी सोडून निरपराधाला शिक्षा करणे.
चिंती परा ते येई घरादुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते.
चोर तो चोर नि वर शिरजोरचोरी करणे आणि आणखी शिरजोरी करणे.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळीउपकार करणाऱ्याचे नेहमी गुणगान गावे.
जशी देणावळ तशी धुणावळआपण जसे दुसऱ्याला उपयोगी पडतो, तसे दुसरे आपल्याला उपयोगी पडतात.
जसा गुरू तसा चेलागुरु जसे शिक्षण देतील तसेच विद्यार्थी तयार होतील.
ज्याचे हाती ससा, तो पारधीकर्तृत्व एकाचे पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळीएकाच परिस्थितीत माणसे एकमेकांना चांगली ओळखून असतात.
जे चकाकते ते सर्व सोने नसतेज्या वस्तू वरून चमकतात त्या सर्व मौल्यवान असतातच असे नाही.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारीआई मुलावर जे संस्कार करते ते जन्मभर टिकतात.
ज्याचे करावे बरे, तो म्हणतो माझेच खरेएखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोध करतो.
घेता दिवाळी, देता शिमगाघेताना आनंदाने घेणे देताना आरडाओरड करणे.
चाल बैला चाल, हरळीवर माती घालकाहीना काही काम करा.
चित्त नाही थारी, बावन तीर्थे करीमनाला समाधान नसेल तर तीर्थयात्रा करूनही ते मिळत नाही.
चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाईघरात शूर पण बाहेर घाबरट असणे.
चोपडीबाई कुठे गेली, आंबट कढी उतू आलीमूळचा स्वभाव काही बदलत नसतो.
जळते घर भाड्याने कोण घेतोनुकसानकारक गोष्टीचा स्वीकार करणे योग्य नसते.
जळत्या घराचा पोळता वासाप्रचंड नुकसानीतून जे काही वाचेल ते आपले मानून समाधान मानणे.
जनात बुवा आणि मनात कावाबाहेरून चांगले दिसणे पण मनात कपट असणे.
जसा भाव तसा देवज्याप्रमाणे भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते.
जळत्या घरावर वांगी भाजून घेणेदुसऱ्याच्या नुकसानीत आपला फायदा करून घेणे.
ज्याचा खावा ठोंबरा, त्याचा राखावा उंबराज्याचे अन्न खावे त्याच्याशी एकनिष्ठ असावे.
झ ते ढ
झाकली मूठ सव्वा लाखाचीआपल्याजवळ जे आहे त्याविषयी कुणालाही न सांगणे.
झोपेला धोंडा, भूकेला कोंडामाणूस थकला की दगड असला तरी झोपतो व भूकेवर काहीही गोड लागते.
झाकले माणिक, बुद्धी आणिकहुशारीचा डिंगोरा न पिटणाऱ्याची योग्यता मोठी असते.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीकष्ट केल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही.
डोंगर पोखरून उंदीर काढणेखूप प्रयत्न केल्यानंतरही थोडेसे यश मिळणे.
डोंगराएवढी हाव, तिळाएवढी धावमहत्त्वाकांक्षा मोठी परंतु कुवत नसणे.
डोळ्यात केर अन् कानात फुंकर / आग सोमेश्वरी बंब रामेश्वरीसंकट एका प्रकारचे आणि उपाय भलताच.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागलावाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.
झाडाजवळ छाया बुवाजवळ बायाजेथे प्रेमाची सावली मिळते तेथेच लोक गोळा होतात.
त ते न
ताकापुरती आजीबाई / ताकापुरते रामायणआपले काम होईपर्यंत एखाद्याची प्रशंसा किंवा विचारपूस करणे.
ताटाखालचे मांजरदुसऱ्याच्या पूर्णपणे अधीन असणे.
तुकारामबुवाची मेखन सुटणारी किंवा गुंतागुंतीची गोष्ट.
तोंड दाबून बुक्क्यांचा मारनुकसान होत असूनही लाचारीने शांत राहणे.
तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आलेदोन फायद्यांच्या नादात दोन्हीकडून निराशा पदरी पडणे.
तहान लागल्यावर विहीर खणणेगरज वाटल्यावर त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात करणे.
तापल्या तव्यावर भाकरी भाजून घेणेपरिस्थिती अनुकूल असताना आपले कार्य करून घेणे.
थेंबे थेंबे तळे साचेथोडे थोडे साठविल्यास पुढे मोठा संचय होतो.
दिव्याखाली अंधारमाणूस कितीही मोठा असला तरी त्याच्यात काही वाईट गुण असतातच.
दुभत्या गायीच्या लाथा गोडज्या व्यक्तीकडून फायदा होतो त्याचा त्रास सहन केला जातो.
देव तारी त्याला कोण मारी ?देवाची कृपा असेल तर कोणीही वाईट करू शकत नाही.
देश तसा वेशपरिस्थितीनुसार वागणे.
धरले तर चावते, सोडले तर पळतेकोणत्याही उपयोगाचे नसणे.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नआधीच कठीण कामात आणखी अडचणी येणे.
नव्याचे नून दिवस / तेरड्याचा रंग तीन दिवसकोणत्याही गोष्टीची नवलाई थोडाच काळ टिकते.
नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे / पालथ्या घड्यावर पाणीकेलेल्या उपदेशाचा काहीच परिणाम न होणे.
नाक दाबले की तोंड उघडतेएखाद्याचे वर्म जाणून दबाव आणला की काम होते.
नाकापेक्षा मोती जडमालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे.
नावडतीचे मीठ आळणीनावडत्या व्यक्तीने कितीही चांगले केले तरी ते वाईटच वाटते.
नाचता येईना अंगण वाकडे / चूल पेटेना ओली लाकडेकाम करता न आल्यास काहीतरी कारणे सांगणे.
नालासाठी घोडा मेलाछोटी चूक वेळेवर दुरुस्त न केल्यास मोठे नुकसान होते.
ताकाला जाऊन भांडे लपवू नयेकमीपणा वाटणारी गोष्ट करताना संकोचू नये.
दमडीचा सौदा येरझारा चौदालहानशा कामाला अतिशय श्रम खर्च होणे.
दाम करी काम, बिबी करी सलामपैशाने सर्व गोष्टी साध्य होतात.
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाहीदुसऱ्याचे लहान दोष दिसतात पण स्वतःचे मोठे दोष दिसत नाहीत.
प ते म
नाव सोनुबाई हाती कथळाचा वाळा / भपका भारी खिसा खालीनाव मोठे पण कर्तृत्व किंवा संपत्ती कमी प्रतीची असणे.
नाकाने कांदे सोलणेफार बढाया मारणे.
निंदकाचे घर असावे शेजारीदोष दाखविणारा शेजारी असल्यास सुधारणा होते.
पी हळद आणि हो गोरीकोणत्याही गोष्टीत अतिउतावळेपणा करणे.
पुढच्यास ठेच मागचा शहाणादुसऱ्याच्या अनुभवावरून आपल्या चुका टाळणे.
पोटात एक अन् ओठात एक / ओठात एक पोटात एकमनात वेगळे विचार आणि बाहेर बोलणे वेगळे असणे.
बळी तो कान पिळीबलवान व्यक्ती इतरांवर हुकूमत गाजवते.
बडा घर पोकळ वासा / नाव मोठे लक्षण खोटेकेवळ वरवरचे मोठेपण पण आतून काहीच नसणे.
बावळी मुद्रा देवळी निद्रादिसण्यात बावळट पण व्यवहारात चतूर असणे.
भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरीएखाद्याला आश्रय दिला की त्याने गैरफायदा घेणे.
भरवशाच्या म्हशीला टोणगाज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्यानेच विश्वासघात करणे.
भित्यापाठी ब्रह्मराक्षसभित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते.
भीक नको पण कुत्रं आवरमदत नको पण अडथळा तरी आणू नकोस.
म्हातारीने कोंबडे झाकले तरी उजाडायचे राहत नाहीजी गोष्ट व्हायची आहे ती प्रयत्नांनी थांबत नाही.
मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी ?जोखमीचे काम करण्यास कोणी पुढे येत नाही.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतातलहान वयातच मुलांचे गुण-दोष लक्षात येतात.
धन्याला हाल, कुत्रे पडले लालमालकापेक्षा नोकर श्रीमंत होणे.
नकटे राहावे, पण आकडे राहू नयेपरिस्थितीशी जुळवून घ्यावे पण कलंकित राहू नये.
पाण्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूरज्याची श्रद्धा नसते त्याच्यापासून देव दूर असतो.
बाजारात तुरी भट भटणीला मारीअवास्तव कल्पनेचा आधार घेणे व भांडणे.
वारा पिंपळावरचा पुजाचंचल आणि स्थिर न राहणारा माणूस.
मनात मांडे, पदरात धोंडेमोठी स्वप्ने पाहायची पण प्रत्यक्षात काही न मिळणे.
महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचतीनम्र राहणाऱ्याचे जीवन सुखाचे होते.
मुख में राम, बगल में छुरीबोलताना सज्जन पण मनातून कपटी असणे.
य ते व
रात्र थोडी, सोंगे फारकामे पुष्कळ आणि वेळ कमी असणे.
रोजचे मढे त्याला कोण रडेतीच गोष्ट वारंवार झाली की त्यात स्वारस्य राहत नाही.
राजाचे घोडे आणि खासदार उडे / दिमाख दुसऱ्याचावस्तू एकाची आणि हुकूमत किंवा दिमाख दुसराच दाखवतो.
लग्नाला गेली आणि बारशाला आलीअतिशय संथ गतीने चालणे किंवा उशिराने पोहोचणे.
वड्याचे तेल वांग्यावरएकाचा राग दुसऱ्यावर काढणे.
वरातीमागून घोडे / बैल गेला अन् झोपा केलायोग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे व्यर्थ असते.
विंचवाचे बिहऱ्हाड पाठीवरनेहमी आपले साहित्य सोबत ठेवणे.
या बोटाची थुंकी त्या बोटावरमनाला वाटेल तसे शब्द बदलणे.
रिकामे मन आणि कुविचाराचे धनकाम नसेल तर मनात वाईट विचार येतात.
सांडगा आला भेटीला कुत्रा गेला गावालापाहुण्यांची परस्पर बोळवण करणे.
श ते ह
शहाण्याला शब्दाचा मारशहाण्या व्यक्तीला फक्त समज दिली तरी पुरेशी असते.
शेरास सव्वाशेर / चोरावर मोरएकापेक्षा दुसरा वरचढ असणे.
शेंडी तुटो की पारंबी तुटोदृढनिश्चय करणे.
सरड्याची धाव कुंपणापर्यंतमर्यादित क्षमतेपर्यंतच काम करणे.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीस्वतः लक्ष घातल्याशिवाय काम पूर्ण होत नाही.
सोनाराकडून कान टोचले म्हणजे दुखत नाहीयोग्य व्यक्तीकडून केलेले काम चांगले होते.
सुंभ जळाला तरी पीळ जात नाहीवैभव गेले तरी गर्व किंवा स्वभाव जात नाही.
हत्ती गेला अन् शेपूट राहिलेजवळपास सर्व काम होणे पण थोडेसे शिल्लक राहणे.
हसे त्याला बाळसेहसतमुखी माणूस निरोगी राहतो.
हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागू नयेमिळालेली वस्तू सोडून अशक्य गोष्टीच्या मागे धावू नये.
हातच्या कांकणाला आरसा कशाला?जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तिला पुराव्याची गरज नसते.
हिऱ्यापोटी गारगोटीचांगल्या पालकांच्या पोटी दुर्गुणी अपत्य जन्मास येणे.
होळी जळाली आणि थंडी पळालीहोळीनंतर थंडी कमी होते.
देणे कुसळाचे घेणे मुसळाचेथोड्या मेहनतीत भरपूर फायदा करून घेणे.
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नयेएखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
तुझं आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी / काखेत कळसा गावाला वळसावस्तू जवळ असून बाहेर शोधणे.
व्यक्ती तितक्या प्रकृती / पाचही बोटे सारखी नसतातप्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीचांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात.
दहा गेले, पाच उरलेआयुष्य कमी उरणे.
सर्पाला दूध पाजले तरी विषच ओकणारवाईट प्रवृत्तीचे स्वरूप बदलत नाही.
साखर हातावर कातर मानेवरगोड बोलून गळा कापणे.
हा सूर्य हा जयद्रथपुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
हातावर कमवावे, पानावर खावेरोजच्या रोज श्रम करून उदरनिर्वाह करणे.

हाती आले, अन् घशाशी अडकलेमिळता मिळता गोष्ट हातातून जाणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा