आजच्या काळात चित्रपट हे केवळ अडीच-तीन तासांचे मनोरंजन उरलेले नाही, तर ते समाजाची मानसिकता घडवण्याचे आणि बिघडवण्याचे एक प्रभावी 'वैचारिक शस्त्र' बनले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर २' हा चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्याला मुख्य प्रवाहातील मीडियाकडून (Mainstream Media) होणारा विरोध पाहिल्यानंतर माझ्या मनात काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले.
एक शिक्षक म्हणून गेली १८ वर्षे समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे निरीक्षण करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या नावाखाली आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली कुटुंबव्यवस्था जाणीवपूर्वक कशी मोडीत काढली आहे. हा केवळ योगायोग नाही, तर हा एक अतिशय थंड डोक्याने राबवलेला अजेंडा