मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

“Playing It My Way”या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राची स्वैर समरी

आज आपण“Playing It My Way” या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राची स्वैर समरी पाहणार आहोत.
या पुस्तकाची सुरुवात सचिन आपल्या निवृत्तीच्या दिवशी (१६ नोव्हेंबर २०१३, वानखेडे स्टेडियम) दिलेल्या भाषणापासून पुस्तकाची सुरुवात करतो. भावनिक निरोप, चाहत्यांचे प्रेम आणि क्रिकेटला दिलेली अखेरची सलामी हा या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे.
“Playing It My Way” हे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे आत्मचरित्र आहे. या पुस्तकात सचिनने स्वतःचा प्रवास, त्यातील संघर्ष, यश, अपयश, कौटुंबिक गोष्टी, मैत्री, संघकार्यातील अनुभव, तसेच भारतासाठी खेळण्यामागची खरी भावना यांचे प्रामाणिक चित्रण केले आहे. हे पुस्तक फक्त एका महान खेळाडूची कहाणी नाही, तर मेहनत, चिकाटी, शिस्त आणि नम्रता यांचे उत्तम उदाहरण आहे.
बालपण आणि क्रिकेटची सुरुवात
सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत झाला. वडील रमेश तेंडुलकर हे साहित्यिक होते, तर आई राजनी गृहिणी. सचिन लहानपणापासूनच खट्याळ, उर्जावान आणि क्रिकेटच्या चेंडूला बॅटने मारण्यात रमणारा मुलगा होता.
११व्या वर्षी सचिनला कोच रमाकांत आचरेकर यांनी शाळेच्या क्रिकेटमध्ये आणलं. आचरेकर सरांच्या शिस्तीमुळे आणि कठोर प्रशिक्षणामुळे सचिनच्या आयुष्याला दिशा मिळाली. ते त्याला शिवाजी पार्कवर घेऊन जात आणि तासनतास फलंदाजी करायला लावत. सरांच्या शिकवणीमुळे सचिनमध्ये शिस्त, संयम आणि सरावाची भूक निर्माण झाली.
पहिलं आंतरराष्ट्रीय पदार्पण
१९८९ मध्ये फक्त १६ वर्षांचा असताना सचिनने पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत पदार्पण केलं. वसीम अक्रम, वकार युनुस यांसारख्या धडाडीच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना तो फारसा घाबरला नाही. पहिल्याच सामन्यात वकार युनुसच्या बाऊन्सरने चेहऱ्यावर लागलं पण सचिनने हार मानली नाही.त्याच मालिकेत पहिले कसोटी अर्धशतक सचिनने केले. या मालिकेतच माध्यमांचं लक्ष सचिन कडे वेधलं गेलं.जरी पहिल्या मालिकेत मोठं यश मिळालं नाही तरी लोकांच्या लक्षात आलं की भारतीय संघात भविष्याचा महान खेळाडू आला आहे.
क्रिकेट कारकीर्दीतील सुवर्णक्षणे
सचिनच्या कारकीर्दीत असंख्य सुवर्णक्षणे आहेत. काही महत्त्वाची क्षणपुस्तकात उलगडली आहेत:
1. १९९८ – शारजाह वाळवंटातील वादळ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली शतकं ही सचिनच्या सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते.
2. २००३ विश्वचषक : भारताला फायनलपर्यंत पोहोचवण्यात सचिनच्या धडाकेबाज फलंदाजीचा मोठा वाटा होता.
3. २००७-२०११ कालखंड : जरी वय वाढत होतं, तरीही सचिनचा खेळ अधिक परिपक्व होत गेला.
4. २०११ विश्वचषक जिंकण्याचा क्षण : सचिनच्या स्वप्नपूर्तीचा दिवस. स्वतःच्या घरच्या मैदानावर (मुंबई – वानखेडे) भारताने विश्वचषक जिंकला आणि सचिनला खऱ्या अर्थाने समाधान मिळालं.
अडथळे आणि संघर्ष
पुस्तकात सचिनने आपल्या दुखापती, शारीरिक वेदना आणि मानसिक ताण-तणाव यांचाही प्रामाणिक उल्लेख केला आहे. टेनिस एल्बोमुळे झालेला त्रास, शस्त्रक्रिया आणि परत येण्यासाठी केलेला संघर्ष. कधी कधी चाहत्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढून मानसिक दडपण निर्माण व्हायचं.कर्णधारपद मिळालं तेव्हा संघातले मतभेद आणि त्याने अनुभवलेला ताण.पण प्रत्येक वेळी सचिनने मेहनत आणि खेळावर लक्ष केंद्रित करून हे संकटं पार केलं.
कौटुंबिक जीवन
सचिनने अजित (मोठा भाऊ) यांचा खूप उल्लेख केला आहे. अजितनेच त्याला क्रिकेटकडे नेलं. आई-वडील यांचा आधार, भावंडांची माया यामुळेच तो एवढा मोठा खेळाडू झाला.अंजलीशी लग्न हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता. अंजलीने डॉक्टर म्हणून करिअर सोडून सचिनच्या कारकिर्दीला पूर्ण पाठिंबा दिला. मुलं सारा आणि अर्जुन यांच्यामुळे सचिनला आयुष्याचा वेगळा आनंद मिळाला. अर्जुनच्या क्रिकेटकडे वळण्याचा उल्लेखही पुस्तकात आहे.
भारतीय क्रिकेट संघातील अनुभव
सचिनने सहकाऱ्यांबद्दल मनमोकळं लिहिलं आहे.राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे यांच्याशी त्याची घट्ट मैत्री होती. एम.एस. धोनीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं आहे.काही वेळा निवड समिती, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट (BCCI) यांच्यासोबतचे तणाव, मीडिया दबाव यांच्याविषयीही तो बोलतो.
सचिनचे जीवनाचे तत्व
सचिनच्या आयुष्याचा मुख्य आधार म्हणजे कष्ट आणि नम्रता.तो म्हणतो, “मी कधीच रेकॉर्डसाठी खेळलो नाही, नेहमी भारतासाठी खेळलो.”प्रत्येक सामना हा त्याच्यासाठी नवा आव्हान असे.त्याला मिळालेलं मान-सन्मान, पुरस्कार, ‘भारत रत्न’ याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो. स्वप्न मोठं असलं तरी त्यामागे शिस्त, संयम आणि कठोर मेहनत असली पाहिजे. कुटुंब, गुरु, मित्र आणि चाहत्यांचा आधार यशामध्ये महत्त्वाचा असतो.खेळ ही फक्त करमणूक नाही तर देशासाठी अभिमानाची बाब असते.हे तो अतिशय स्पष्टपणे व्यक्त करतो.सचिन फक्त ११व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला. त्याच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे तो जगप्रसिद्ध झाला. लहान सुरुवात कधी कमी लेखू नये.आचरेकर सरांच्या शिस्तीमुळे सचिन घडला. योग्य गुरु मिळाले तर आयुष्याची दिशा बदलते.सचिन रोज तासन्‌तास सराव करायचा. तो म्हणतो – “प्रतिभेपेक्षा सराव आणि शिस्त महत्त्वाची.”अपयश हा शिक्षक असतो, शत्रू नाही. जगातला सर्वोत्तम फलंदाज असूनही सचिनने कधी गर्व केला नाही. नम्रता ही महानतेचं खऱं लक्षण आहे.द्रविड, गांगुली, कुंबळे, धोनी अशा सहकाऱ्यांच्या मदतीमुळे भारताने अनेक विजय मिळवले. सचिन म्हणतो – “खेळ एकट्याचा नसतो, संघाचाच असतो.”सचिनवर कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा होती. तरीही त्याने खेळावर लक्ष केंद्रित ठेवलं. दडपणातही स्थिर राहणं ही खरी कला आहे. २३-२४ वर्षांची कारकीर्द असूनही सचिन रोज नवे शॉट्स, नवे तंत्र शिकत राहिला. यश आलं की शिकणं थांबवू नये. हे अतिशय प्रांजलपणे सचिन म्हणतो.
 या पुस्तकांमध्ये आपल्याला अनेक प्रेरणादायी सुविचार पहावयास मिळतात. जसे की
1. “मोठं स्वप्न नेहमी छोट्या पावलांनी सुरू होतं.”
2. “गुरुंचं मार्गदर्शन आयुष्याची खरी दिशा ठरवतं.”
3. “प्रतिभेपेक्षा सराव आणि शिस्त माणसाला उंच नेते.”
4. “अपयश शत्रू नाही, तो सर्वोत्तम शिक्षक आहे.”
5. “नम्रता हीच महानतेचं खरं लक्षण आहे.”
6. “कुटुंबाचा पाठिंबा हीच यशाची खरी ताकद आहे.”
7. “संघाशिवाय एकट्याने कोणीच जिंकू शकत नाही.”
8. “दडपणाखाली शांत राहणं हीच खरी कला आहे.”
9. “यश मिळालं तरी शिकणं थांबवू नका.”
10. “देशासाठी काम करणं हीच सर्वोच्च भावना आहे.”
11. “दीर्घकाळ यशस्वी राहायचं असेल तर शरीराची आणि आरोग्याची काळजी घ्या.”
12. “निरोपही शिस्तबद्ध आणि कृतज्ञतेने दिला पाहिजे.”
२०१३ मध्ये वानखेडेवर खेळलेली त्याची शेवटची कसोटी ही भावनिक ठरली. निवृत्ती भाषणात त्याने चाहत्यांपासून कुटुंबापर्यंत सगळ्यांचे आभार मानले. त्या दिवशी संपूर्ण भारताच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
धन्यवाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते

🚜 वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र लेखक: अतुल कहाते | प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 📘 पुस्तकाचा परिचय प्रस्तावना शेअ...