मित्रांनो आजच्या बुक समरीमध्ये मी तुम्हाला द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून आठ महत्त्वाचे पैशांचे नियम सांगणार आहे.
1) पहिला नियम - तुम्हाला सगळं माहिती असतच असे नाही. आपण आपल्या अनुभवावरूनच जगाचा अंदाज बांधत असतो. पण कधी कधी आपला अनुभव इतका मर्यादित असतो, आपण समजतो आपल्याला सगळं कळतं मात्र वास्तव काही वेगळंच असतं. एका गावात एक लहान मेंढपाळ मुलगा राहत होता. तो रोज आपल्या मेंढ्याना चरण्यासाठी एका डोंगरावर घेऊन जायचा. त्या डोंगराच्या एका बाजूला त्याला पसरलेले हिरवेगार दृश्य दिसायचे आणि त्याला वाटायचं की, हा परिसरच संपूर्ण जग आहे. त्याच्यासाठी जग म्हणजे फक्त त्याच्या गावाच मैदान तिथली काही झाडं आणि तो डोंगर होता. एके दिवशी तिथून प्रवास करत असलेल्या एका व्यापाऱ्याशी त्याची भेट झाली. त्या व्यापाऱ्याने त्याला विचारलं तुला वाटतं का की तू जग पाहिलं आहेस? मुलगा म्हणाला," होय माझ्या डोंगरावरून मला सगळं जग स्पष्ट दिसतं". हे ऐकून व्यापारी हसला आणि त्याला सोबत घेऊन डोंगराच्या दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. मुलाने पाहिलं की समोर एक विशाल शहर आहे. तेथे मोठमोठ्या इमारती गाड्या आणि लोकांची गर्दी होती. तो थक्क झाला. तेव्हा व्यापारी म्हणाला तुला वाटत होतं की तुला सगळं माहिती आहे, पण प्रत्यक्षात तुझी माहिती फक्त तुझ्या डोंगरा एवढीच होती. तात्पर्य काय मित्रांनो आपल्याला वाटतं की आपण खूप काही समजून घेतल आहे.मला सर्व काही माहिती आहे.पण जग खूप मोठं आहे. वेगवेगळ्या लोकांचे अनुभव दृष्टिकोन आणि विचार आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात, म्हणूनच नेहमी शिकत रहा नव्या गोष्टी समजून घ्या. द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचे लेखक मॉर्गन हाउसल म्हणतात की, पैशांबाबत तुमचा अनुभव हा जगभरात जे काही घडलंय त्याच्या फक्त 0.001% एवढाच असतो. 80% अनुभव हा त्या विचारावर आधारित असतो जे तुम्ही मान्य करून बसलेले असता. उदाहरणार्थ जर कोणाच्या काकांना 20 वर्षांपूर्वी स्टॉक मार्केटमध्ये नुकसान झाल असेल तर तो मानून बसेल की स्टॉक मार्केटमध्ये फक्त नुकसानच होते. जर कोणाच्या मामाला रियल इस्टेट मध्ये तोटा झाला असेल तर तो ठरवेल की रियल इस्टेट म्हणजे फसवणूक, कोणाच्या भावाचा व्यवसाय बुडाला तर तो समजेल बिझनेस करायचाच नाही. ही सर्वात मोठी चूक आहे. तुमचा अनुभव मर्यादित असतो. त्यामुळे फक्त त्याच्यावर अवलंबून राहू नका. मित्रांनो फक्त स्वतःच्या अनुभवांवर गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका. चांगल्या फायनान्शियल पुस्तकांचा अभ्यास करा. जितकी जास्त माहिती मिळेल तितके चांगले निर्णय घेता येतील.
2) दुसरा नियम - प्रत्येक गोष्ट तितकी चांगली किंवा तितकी वाईट नसते, जितकी ती दिसते. मित्रांनो हे जग एवढे गुंतागुंतीचे आहे की आपण त्याला पूर्णपणे समजू शकत नाही आणि बऱ्याच वेळी आपण ज्या गोष्टी करतो त्याचे परिणाम आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ समजा, एखाद्या उद्योजकाने एक जबरदस्त प्रॉडक्ट तयार केला आहे. त्याला वाटतय वेळही योग्य आहे. ग्राहक सुद्धा ते प्रॉडक्ट घ्यायला तयार आहेत, पण अचानक एखादं नैसर्गिक संकट किंवा अनपेक्षित घटना घडते आणि संपूर्ण मार्केट कोलमडते. त्याचा पूर्ण प्लन वाया जातो काहीसा असच 2020 मध्ये कोविडच्या काळात घडलं होतं द सायकॉलॉजी ऑफ मनीचे लेखक मॉर्गन हाउसल सांगतात की, जीवनात प्रत्येक गोष्ट तितकी चांगली किंवा वाईट नसते जितकी ती वाटते, म्हणूनच कोणताही फायनान्शियल निर्णय घेताना नशिबाचा आणि जोखमीचा म्हणजे रिस्कचा विचार करणं खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे फक्त एका यशस्वी व्यक्तीची स्टोरी ऐकून गुंतवणूक करू नका. फक्त एका अपयशाच्या गोष्टीमुळे एखादी आयडिया सोडून देऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला यश किंवा अपयश वेगळ्या कारणांमुळे मिळालं असेल. मग करायचं काय तुमच्या ध्येयावर फोकस ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. चुकांमधून शिका स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा. फक्त स्वतःच्या चुकांवरून शिकायला बसलात तर आयुष्य कमी पडेल. यश डोक्यावर चढू देऊ नका आणि अपयशाने निराश होऊ नका.
3) तिसरा नियम - तुम्हाला किती पैशांची गरज आहे, मित्रांनो स्वतःला एक प्रश्न विचारा माझ्यासाठी किती पैसा पुरेसा आहे. एक राजा होता जो अत्यंत श्रीमंत होता पण तरीही तो आनंदी नव्हता. एक दिवस त्याने आपल्या विद्वान मंत्र्यांना विचारलं माझ्याकडे वैभव आहे, सत्ता आहे, सर्व काही आहे, पण तरी मी आनंदी नाही. मला खरा आनंद मिळवण्यासाठी काय करायला हवं? मंत्र्यांनी हसत उत्तर दिलं, राजन जर तुम्ही खरोखर आनंदी माणसाचा शर्ट घातलात तर तुम्हालाही समाधान मिळेल. राजाने ताबडतोब राज्यभर शोध घ्यायला सुरुवात केली. त्याला अनेक श्रीमंत लोक भेटले, पण त्यांच समाधान पैशाने झालं नव्हतं. काहींना अजून जास्त संपत्ती हवी होती. काहींना सत्ता वाढवायची होती आणि काहींना आपली संपत्ती टिकवण्यासाठी झगडाव लागत होतं. राजा निराश झाला तो असाच भ्रमंती करत एका छोट्या गावात पोहोचला. तिथे त्याला एक गरीब माणूस दिसला. जो साधं जीवन जगत होता, पण कायम हसतमुख आणि आनंदी असायचा. राजाने त्याला विचारलं तू नेहमी आनंदी असतोस याचं रहस्य काय? त्या माणसाने सहज उत्तर दिलं, "महाराज माझ्याकडे जे आहे ते माझ्यासाठी पुरेस आहे, मी माझ्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानतो म्हणूनच मी आनंदी असतो". राजा भारावून गेला, त्याला वाटलं की आता तरी त्याच दुःख संपेल. मला तुझा शर्ट दे, तो घातल्यावर मीही आनंदी होईल. पण अचानक त्याच्या लक्षात आलं त्या माणसाकडे शर्टच नव्हता, आपण अनेकदा समाधान आणि आनंद संपत्तीत शोधत राहतो पण खरा आनंद हा बाह्य गोष्टीमध्ये नाही तर आपल्या आतमध्ये असतो. तुम्हाला किती पैशांची गरज आहे या प्रश्नाचे उत्तर शोधलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी राहू शकता. सतत पैशाच्या मागे धावणं तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतं अशी विचारसरणी तुमच्यात अतृप्ती आणि हाव निर्माण करू शकते. इतिहास सांगतो लोभामुळे अनेक बुद्धिमान आणि यशस्वी लोक संकटात सापडले आहेत, त्यांनी आपलं सर्व काही गमवल आहे. या सापळ्यात अडकू नये म्हणून मॉर्गन हाउसल दोन प्रॅक्टिकल उपाय सांगतात. पहिला आहे, एक ध्येय ठरवा. तुमच्यासाठी एक निश्चित, आर्थिक ध्येय, फायनान्शियल गोल ठरवा. जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा त्याचा आनंद घ्या. स्वतःला
थोडा आराम द्या अपेक्षा नियंत्रणात ठेवल्या तरच तुम्ही आनंदी राहू शकता. दुसरा आहे - स्वतःची तुलना कुणाशीच करू नका. तुमचे आयुष्य, तुमचे विचार, तुमचे निर्णय हे सगळं तुमचंच आहे. स्वतःची तुलना इतरांशी केली तर मानसिक तणाव वाढेल. शांत, समाधानी आणि सुखी राहायच असेल तर फक्त स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा. शेवटी संपत्ती कमवणं गरजेच असलं तरी स्वतःसाठी किती पुरेस आहे हे ठरवणं अधिक महत्त्वाचा आहे. नाहीतर आपण कधीच समाधानी होऊ शकत नाही.
4) चौथा नियम - कंपाउंडिंगची ताकद समजा.
मित्रांनो या विषयात प्रत्येक गोष्ट एका प्रक्रियेनुसार घडते. प्रत्येक कृती छोटी का असेना, ती काही ना काही परिणाम करत असते. याचं साधं उदाहरण घ्या. पाण्याचा प्रवाह वर्षानुवर्षे वाहत राहतो आणि तो मजबूत दगडांचा आकार सुद्धा बदलू शकतो. द सायकॉलॉजी ऑफ मनीचे लेखक मॉर्गन हाऊस म्हणतात, "शहानपणाने गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे पण मोठी संपत्ती निर्माण करणं हे तुम्ही किती दीर्घकाळ गुंतवणूक केली आहे यावर अवलंबून असतं". वरन बफेट यांची संपत्ती 84 अब्ज डॉलर्स आहे. ज्यापैकी 18 अब्ज डॉलर्स त्यांनी 65 व्या वर्षानंतर कमवले आहेत. जिम सायमन्स हे जगातील सर्वात महान गुंतवणूकदार मानले जातात, कारण त्यांनी आपल्या कॅपिटलवर 66% परतावा मिळवला आहे दुसरीकडे वॉरेन बफेट यांनी 22% परतावा मिळवला आहे, मग वॉरन बफेट सायमन्स पेक्षा श्रीमंत का? उत्तर आहे कंपाउंडिंग जिम सायमन्स यांनी 50व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर वॉरन बफेट यांनी वयाच्या दहाव्या वर्षी सुरुवात केली. लहान लहान प्रयत्न सातत्याने आणि दीर्घकाळ करत राहिल्यास असाधारण परिणाम मिळतात.
5) पाचवा नियम- श्रीमंत होणे आणि श्रीमंत राहणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. मित्रांनो इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आज साईड बिझनेस सुरू करणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही स्टॉक्समध्ये, क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करून पटकन नफा कमवू शकता. थोडे भांडवल, योग्य माहिती आणि रिस्क घेण्याची हिंमत असेल तर श्रीमंत होता येते, पण श्रीमंत राहणं हे खरं आव्हान आहे. आजच्या जगात पैसा कमवणं सोप्पं झालंय, पण खर्च करणंही सोप्पं झालंय. मोठ्या शहरांमध्ये आकर्षक जाहिराती, फ्री क्रेडिट कार्ड्स, लो कॉस्ट लोन, गिफ्ट कुपन सारख्या ऑफर्स आपल्याला सतत मोहात पाडतात. तर मग पैसा वाचवायचा कसा मॉर्गन हाउसल यांनी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली आहे श्रीमंत राहण्यासाठी शहानपणाने खर्च करा. काल तुम्हाला यश मिळालं त्याचा अर्थ हा नाही की उद्याही तसच होईल. प्रत्येक आर्थिक निर्णय आधीपेक्षा तितक्याच विचारपूर्वक घ्या. कंजुसी न करता काटकसर करा. दुसरी आहे, उपयुक्तता आणि कंजूस यातला फरक समजा. जिथे गरज आहे तिथे खर्च करा, अनावश्यक खर्च टाळा. तिसरी आहे नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे इच्छा. यातला फरक समजून घ्या. गरज म्हणजे जी गोष्ट तुमचे आयुष्य आणि कामासाठी आवश्यक आहे. इच्छा म्हणजे जी गोष्ट फक्त आकर्षक वाटते पण खरी गरज नाही. जर तुम्ही प्रत्येक खरेदीच्या आधी, ही माझी गरज आहे की इच्छा? हा प्रश्न विचाराल तर तुम्ही हमखास पैसे वाचू शकाल. सहावा नियम 'लॉ ऑफ लार्ज नंबर्स' मोठ्या संख्येचा नियम मित्रांनो 'लॉ ऑफ लार्ज नंबर' म्हणजे एखादा प्रयोग जितक्या जास्त वेळा केला जाईल, तितक्या वेळा त्याची यशस्वी होण्याची शक्यता वाढते. जर तुमचे गोल्स दहा पट मोठे असतील आणि तुम्ही त्यांना 100 टक्के पूर्ण न करता 70 /80 टक्के जरी गाठलं, तरी तुम्ही जिंकाल. ग्रँड कार्डन यांच्या 'टेनेस रूल' या पुस्तकामध्ये हेच सांगितल आहे. मोठं ध्येय ठेवा, मोठे काम करा, मोठं यश मिळवा. इन्हेस्टमेंट मध्ये लॉ ऑफ लार्ज नंबर्स कसा लागू होतो तर वेगवेगळ्या गोष्टी मध्ये गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. जर तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल तर तुम्ही एका स्टॉकवर अवलंबून राहणार नाही. तुम्ही अर्ध्या वेळा चुकला तरी तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
7) सातवा नियम - वेळेने श्रीमंत व्हा.
तुम्हाला काय वाटतं जास्त पैसा कमवण्याचा फायदा काय आहे? प्रसिद्धी हवी, कोणतीही गोष्ट खरेदी करण्याची ताकद हवी? लेखक मॉर्गन हाउसल म्हणतात की, पैशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या वेळेवर असलेले तुमचे नियंत्रण. खरं सुख म्हणजे काय? संशोधन सांगतं की, जे लोक स्वतःला खूप आनंदी मानतात त्यांच्याकडे 'टाईम फ्रीडम' असते. म्हणजे त्यांना वेळेचे कसलेच बंधन नसते. त्यांना कुठेही येण्या जाण्यासाठी हवं ते करण्यासाठी वेळ उपलब्ध असतो. ते रोज आठ ते दहा तास एका ठिकाणी बसून काम करायला बांधील नसतात, म्हणून पैसा महत्त्वाचा आहे. पैसा असला की तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुम्हाला मनाविरुद्ध ऑफिसमध्ये बसून राहण्याची गरज नाही. लेखक म्हणतात, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे सकाळी उठून हे म्हणता येणं की आज मी हवं ते करू शकतो. मग यासाठी काय करायला हवं? सर्वात आधी इमर्जन्सी फंड तयार करा. किमान सहा महिन्यांसाठी पुरेल इतका पैसा साठवून ठेवा. जेणेकरून जर तुम्ही सहा महिने काम केलं नाही तरी तुमचं जगणं सहज शक्य होईल. जेव्हा हा फंड तयार होईल, मग पुढचा विचार करा. नोकरी सोडायची की नाही, रिस्क घ्यायची की नाही.
8) आठवा नियम - लक्जरी म्हणजे ऐशो आरामाचे आयुष्य जगणे. तुम्ही कधी रस्त्यावरून गेल्यावर एखादी जबरदस्त स्पोर्ट्स कार बघितली आहे का? त्या क्षणाचा विचार करा, तुम्ही कार बघून खूप एक्सायटेड झाला असाल पण त्या कारला चालवत कोण होतं ते आठवतय का 99% लोकांना फक्त कार आठवतेय ड्रायव्ह नाही. जर तुम्ही कोणतीही वस्तू फक्त दाखवण्यासाठी घेत असाल तर लोक त्याने इम्प्रेस होत नाहीत. लोक तुमच्याकडे पाहत नाही ते फक्त त्या वस्तूकडे पाहतात त्यामुळे स्वतःची किंमत वाढवा मग तुम्ही पाई चाललात, सायकलवर गेलात तरी लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतील. तुम्हाला वाटतं की लोक तुमच्या महागड्या वस्तू बघून इम्प्रेस होतात. पण सत्य हे आहे की जास्तीत जास्त लोक त्याच वेळी विसरून जातात. एक सामान्य कारही तुम्हाला पॉईंट ए ते पॉईट बी ला घेऊन जाईल आणि फरारी तेच करेल फरक एवढाच की फरारी विकत घेण्यासाठी आणि तिच मेंटेनन्स ठेवण्यासाठी खूप जास्त पैसा लागतो. लक्जरी आयटम्स म्हणजे लायबिलिटी असतात ॲसेट्स नाही. श्रीमंत होण्याचे सोपे सूत्र म्हणजे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत व्हा. गरीब होण्याचा सोपा मार्ग म्हणजे श्रीमंत असल्याच फक्त दाखवणं. रॅपर जेज म्हणतो, "जर तुम्ही एखादी वस्तू दोनदा विकत घेऊ शकत नसाल तर तुम्हाला ती वस्तू परवडत नाही असे समजावे". कोणतीही महागडी वस्तू घ्यायचा मोह झाला तर 30 दिवस थांबा 30 दिवसांनी जर ती वस्तू खरोखर गरजेची वाटली तरच ती विकत घ्या. पैसे अशा गोष्टींमध्ये इन्वेस्ट करा जिथे तुमचे पैसे वाढतील. श्रीमंती ही पैशात नसते तर तुमच्या सवयींमध्ये असते. श्रीमंत लोकांची एक खास सवय असते, ते पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. पैसे कमवण्यासाठी स्वतः काम करत नाहीत. म्हणजेच इन्हेस्टमेंट ही श्रीमंतीकडे नेणारी खरी चावी आहे. मित्रांनो द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून होते ते आठ जबरदस्त नियम. तुम्हाला आवडलेले नियम मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा