हे चरित्र 'महात्मा ज्योतिराव फुले यांचा अल्प - परिचय' मूळतः श्री. पंढरीनाथ पाटील यांनी लिहिले आहे, ज्यांना फुलेंचे पहिले चरित्र लिहिण्याचा मान मिळाला. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केले आहे.
प्रकाशक म्हणतात,पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले हे चरित्र, फुले यांच्या सत्यशोधक चळवळीमुळे मध्यप्रदेश-वऱ्हाड प्रांतात झालेल्या जनजागरणाचे आणि त्यामुळे तेथे ब्राह्मणेतर पक्ष सत्तेवर येऊन सामाजिक सुधारणा कशा घडल्या, याचे स्मरण करून देते.या पुस्तकाची प्रस्तावना ज बा कुलकर्णी यांनी केली आहे. त्यात ते महात्मा फुले यांचे आधुनिक भारताचे आद्य जनक म्हणून असलेले महत्त्व स्पष्ट करतात. तसेच ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्य, समता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित विचारांची चिरंजीव प्रासंगिकता दर्शवतात तसेच.हे चरित्र शूद्र-अतिशूद्र वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी फुलेंनी केलेल्या संघर्षाची ओळख करून देते, जे आजही प्रेरणादायी आहे, असेही सांगतात.
पं. सि. पाटील यांनी फुलेंच्या कार्याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून, त्यांचे वास्तव आणि विशाल कार्य समाजासमोर आणण्याच्या हेतूने हे चरित्र लिहिले.हे चरित्र साध्या भाषेत लिहून, वाचकांना फुलेंच्या मानवतावादी सत्यधर्माच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी, हा लेखकाचा मुख्य उद्देश आहे.
जन्म, शिक्षण आणि आयुष्याला कलाटणी देणारा अपमान
महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सन १८२७ मध्ये पुणे शहरात एका माळी कुटुंबात झाला.