तुम्ही कधी जेवताना फक्त जेवलेच आहात का? किंवा आंघोळ करताना फक्त आंघोळच केली आहे, उद्याची चिंता किंवा कालची आठवण मनात न आणता? कदाचित नाही, बरोबर ना? आपलं शरीर एका ठिकाणी असतं, पण मन मात्र कुठेतरी भटकायला लागतं. यामुळे आपण आयुष्यातले खरे क्षण गमावून बसतो. पण जर तुम्हाला प्रत्येक क्षण पूर्णपणे जगायची कला शिकायची असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी म्हणजे www.chaitantayaa.in वर आला आहात. आज आपण अशा एका पुस्तकाविषयी बोलणार आहोत, जे तुम्हाला केवळ शांतता देणार नाही, तर प्रत्येक श्वासाने, प्रत्येक पावलाने आणि प्रत्येक क्षणाने जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवेल.
हे पुस्तक आहे व्हिएतनामी झेन गुरु थिच न्हाट हान यांनी लिहिलेलं 'द मिरॅकल ऑफ माइंडफुलनेस'The miracle of mindfulness.